२१ ऑगस्ट दिनविशेष

  • २०२२:भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन .
  • १९११: : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
  • १९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
  • १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
  • १९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
  • १८४१: जॉन हॅम्प्टन यांनी व्हेनेशियन शैलीच्या खिडकीचे पेटंट केले.
  • १९८८: भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले.
  • १९७२: वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली.
  • •१९३८: इटली देशांतील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली.
  • १९१५: पहिल्या महायुद्धा दरम्यान इटलीने तुर्की विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • १९६५: रोमानियाने संविधान स्वीकारले.

२१ ऑगस्ट जन्म/ जयंती

  • १९३४: महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)
  • १९०५: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)
  • १९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)
  • १९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.
  • १९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.
  • १८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
  • १९१५ : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि चित्रपट निर्माता इस्मत चुग़ताई यांचा जन्मदिन. • १९६१: भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.
  • १९१०: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार यांचा जन्मदिन.(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
  • १९०९: कवी नागोराव घन:श्याम तथा ‘ना. घ.‘ देशपांडे यांचा जन्मदिन. (मृत्यू: १० मे २०००)
  • १९२७: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तरप्रदेश, उडीसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचा जन्मदिन.
  • १९२२: अमेरिकन खजिनदार शोधक आणि मेल फिशर मरीन हेरिटेज म्युझियमचे संस्थापक मेल फिशर यांचा जन्मदिन.
  • १७८९: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्मदिन.
    (मृत्यू: २३ मे १८५७)
  • १७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)

२१ ऑगस्ट मृत्यु/ स्मृतिदिन/ पुण्यतिथी

  • १९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)
  • १९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)
  • १९७६: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)
  • १९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ – सातारा, महाराष्ट्र)
  • २०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.
  • २००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
  • २०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.
  • २००१: : आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार शरद तळवलकर यांचे निधन.– (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
  • २००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)
  • २००६: भारत रत्न, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक बिस्मिला खाँ यांचे निधन (जन्म: २१ मार्च १९१६)
  • २००७: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका क़ुर्रतुलऐन हैदर यांचे निधन

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 1 / 5. Vote count: 178

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Comment

error: Content is protected !!